Sunday, 20 February 2011

तलाशाला आणखी एक सुवर्ण

पणजी, दि. १९ (क्रीडा वार्ताहर)
गोव्याची अव्वल जलतरणपटू तलाशा प्रभू हिने रांची येथे सुरू असलेल्या ३४ व्या राष्ट्रीय स्पर्धेत आणखी एक सुवर्ण पदक पटकावले. यामुळे २ सुवर्ण, २ रौप्य व एका कास्य पदकासह तिने एकूण ५ पदकांची कमाई केलेली आहे.
तलाशा प्रभूने आज १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक पटकावत गोव्याच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. गोव्याने सध्या १२ पदकांची कमाई केलेली असून यात ४ सुवर्ण, ४ रौप्य व ४ कास्य पदकांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा