मडगाव, दि.१३ (प्रतिनिधी)
आज (दि.१३) दुपारी पेडा येथील दामोदर विद्यालयाजवळील भुयारी मार्गातील वळणावर झालेल्या भीषण अपघातात कोंबवाडा येथील आदेश केशव कामत हा महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तो दामंोदर वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्या शाखेत शिकत होता. मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो आपल्या पल्सर मोटरसायकलवरून भर वेगाने जात असताना वळणावर समोरून जाणार्या रिक्षाला धडक दिली. यामुळे तो उसळून खाली आदळला. त्याचे डोके रस्त्यावर आदळले व तो गंभीर जखमी झाला. त्याला हॉस्पिसियो इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मडगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवागारात ठेवला. रिक्षा चालकास अटक करून नंतर जामिनावर मुक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा