मडगाव, दि. २२(प्रतिनिधी): एका खूनप्रकरणी सडा तुरुंगात असलेला व तपासणीसाठी गोमेकॉत नेलेला मायकल फर्नांडिस हा कैदी आज सुरक्षा कर्मचार्यांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रकार घडला. मायकल फर्नांडिस या संशयिताला सडा तुरुंगातून तपासणीसाठी गोमेकॉत नेले होते. तेथे तपासणी करून परत सडा येथे नेले जात असताना चिखली येथे पोहोचताच वाहनाचा वेग कमी झाल्याची संधी साधून त्याने चालत्या वाहनातून बाहेर उडी टाकली. तेथे त्याची प्रतीक्षा करणार्या एका मोटरसायकलवरून तो पळून गेला व त्यावरून तो पूर्वनियोजित बेत शिजलेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. नंतर त्याच्या शोधासाठी सर्व भाग पिंजून काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा