Tuesday, 1 February 2011

कुडचिरे अपघातात युवक मृत्युमुखी

डिचोली, दि. ३१ : बारजण कुडचिरे येथे काल सायंकाळी दोन मोटरसायकलींची समोरासमोर टक्कर होऊन त्यात दुचाकीच्या मागे बसलेला रावण कॉलनी येथील गुरू गावस हा २५ वर्षीय युवक मरण पावला. जी ए ०३ एच ३४३४ व एम एच ७ आर ०३४७ असे या दुचाकींचे क्रमांक आहेत. अन्य तिघे या अपघातात जखमी झाले. त्यांची नावे कळू शकली नाहीत. आज गावस याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. उपनिरीक्षक डी. नाईक यांनी या प्रकरणाचा पंचनामा केला.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा