पणजी, दि. १० : गोव्यात होणार्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून लोकसभेतील विरोधी पक्ष उपनेते गोपीनाथ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुवाहाटी येथे नुकत्याच पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी यासंबंधीची घोषणा केली.
सध्या गोव्यात भाजपचे १४ आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. श्री. मुंडे यांच्यासाठी गोवा नवा नाही. यापूर्वी स्व. प्रमोद महाजन हे गोवा भाजपचे प्रभारी असताना पक्ष वाढवण्यासाठी श्री. मुंडे यांनी मोलाचे योगदान दिले होते. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन श्री. मुंडे यांच्यावर केंद्रीय नेत्यांकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली. श्री. मुंडे यांना राजकीय अनुभव आणि त्यांचे संघटन कौशल्य याचा गोवा भाजपला निश्चितच लाभ होईल, असेही श्री. पार्सेकर यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा