पणजी, दि. २८ (विशेष प्रतिनिधी): म्हापसा जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कंबर कसली असतानाच, या निर्णयाला उत्तर गोव्यात विरोध वाढत असून, उद्या (शनिवारी) संध्याकाळी म्हापसा येथे टॅक्सीस्टँडवर गोवा लोकशाही मंचने सर्वपक्षीय जाहीर सभेचे आयोजन केले आहे. या सभेला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व हळदोण्याचे आमदार दयानंद नार्वेकर, भाजपचे आमदार दयानंद मांद्रेकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस अविनाश भोसले व म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर आदी नेत्यांची भाषणे होणार आहेत. खाजगीकरण थांबविण्यासाठी जनतेनेच आता पुढाकार घेतला आहे. यापूर्वी भाजपने विधानसभेत आणि सभागृहाबाहेरही जिल्हा इस्पितळाच्या खाजगीकरणास जोरदार विरोध केला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा