वास्को, दि. ७ (प्रतिनिधी): झुवारीनगर एमईएस कॉलेजवळील आयसीआयसीआय बँकेजवळच्या इमारतीत असलेल्या संदीप गुप्ता यांच्या सदनिकेला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याने सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले.
घटना घडली त्यावेळी घरात कोणीच नव्हते. यामुळे धुराचे लोट बाहेर पडत असल्याचे पाहून शेजार्यांनी त्वरित वेर्णा पोलिस व वास्को अग्निशामक दलाशी संपर्क साधून याची माहिती दिली. अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. वास्को अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलसीडी टीव्ही, लाकडी सामान, एसी व इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने जळून खाक झाल्याने ३ लाखांचे नुकसान झाले तर सुमारे २५ लाखांची मालमत्ता वाचवण्यात आली. आगीच्या धुरामुळे शेजारील घरांना झळ बसली असून त्यांचेही थोड्याप्रमाणात नुकसान झाले. घरातील स्प्लीट एसीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वेर्णा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा