फोंडा, दि. २५ (प्रतिनिधी): धारबांदोडा येथे आज (दि. २५) सकाळी सहाच्या सुमारास टिप्पर ट्रकच्या (क्र. जीए ०९ व्ही १०४१) टायरखाली चिरडला गेल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर तुकाराम गावकर ऊर्फ कुर्टीकर (२६) असे मयत युवकाचे नाव असून तो धावकोण - धारबांदोडा येथील रहिवासी आहे. धारबांदोडा येथे सदर टिप्पर ट्रक बुधवार २४ रोजी रात्री पार्क करून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सकाळी ट्रकाचा चालक ट्रक मागे घेत असताना समीर गावकर याच्या अंगावरून तो गेल्याने त्याचे जागीच निधन झाले. या अपघाताची माहिती सकाळी आठच्या सुमारास फोंडा पोलिसांना देण्यात आली. या अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक सुरेंद्र पास्वान (२२) याला अटक केली आहे. निरीक्षक सी. एल. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्षी आमोणकर तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा