नवी दिल्ली, दि. ४ ः अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळाची निवडणूक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने जिंकली असून त्यामुळे परिषदेच्या गोटात जबरदस्त उत्साह संचारला आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि चिटणीस या तिन्ही महत्त्वाच्या पदांवर अभाविपने दिमाखात झेंडा फडकावला आहे. कॉंग्रेसपुरस्कृत "एनएसयुआय'ला केवळ सहचिटणीस या पदावर समाधान मानावे लागले. दिल्ली विद्यापीठाशी ५१ महाविद्यालये संलग्न आहेत. अत्यंत कडेकोट सुरक्षेत मतदान पार पडले. निकाल जाहीर होताच अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. या निवडणुकीसाठी कडक आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तरीदेखील पैसा व मनगटशाहीचा वारेमाप वापर या निवडणुकीत झाल्याचा ठपका काही उमेदवारांनी ठेवलाच.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा