वाळपई, दि. २३ (प्रतिनिधी)- वाळपई पोटनिवडणुकीसाठी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षातर्फे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर, माजी आमदार अशोक परोब यांनी डमी उमेदवार म्हणून अर्ज सादर केला.
यावेळी मुख्यमंत्री दिगंबर कामत, पक्षाध्यक्ष सुभाष शिरोडकर, वीजमंत्री आलेक्स सिक्वेरा, पाळीचे आमदार प्रताप गावस, लाडू हरवळकर, डॉ. दिव्या राणे, विनोद शिंदे, उदयसिंह राणे आदी उपस्थित होते.
विश्वजित राणे यांच्या अर्जाला सूचक म्हणून उपनगराध्यक्ष उमेश वेंगुर्लेकर व सयाजी देसाई यांनी सही केली तर अशोक परोब यांच्या अर्जावर अख्तर शहा यांनी सही केली. विश्वजित राणे यांनी यावेळी, मतदारांवर आपला पूर्ण विश्वास असून केलेल्या कामांची पोचपावती ते नक्कीच देतील, असा विश्वास व्यक्त केला.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा