Monday, 27 September 2010

"सीबीआय'ला भाजपचे पत्र

गोव्यातील पोलिस आणि ड्रग माफिया साटेलोटे प्रकरणाची "सीबीआय'ने सखोल चौकशी करावी, अशा मागणीचे पत्र आपण "सीबीआय'ला पाठवले आहे. आपण या पत्रात कोणाचेही नाव घेतलेले नाही. कारण यात कोणकोण गुंतले आहेत हे शोधून काढण्याचे काम तपास यंत्रणेचे आहे, असे भारतीय जनता पक्षाच्या गोवा प्रभारी आरती मेहरा यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आपण या प्रकरणाचा दिल्लीत पाठपुरावा करत असल्याचे गेल्या वेळच्या गोवाभेटीत पत्रकारांना सांगितले होते. त्यानुसार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून सदर पत्र "सीबीआय'ला पाठवले आहे. आपण या पत्राचा पाठपुरावाही करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा