पाटणा, दि. ७ ः बिहार पोलिसांनी आज १३ टन गांजा पकडला असून देशातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा पकडण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांच्या या गांज्याप्रकरणी १४ जणांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना बिहारचे पोलिस महासंचालक निलमणी यांनी पीटीआयला सांगितले की, पोलिसांच्या विशेष पथकाने भोजपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी टाक लेल्या धाडीत हा १३ टन गांजा जप्त करण्यात आला असून देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी, असा दावा पोलिसांनी केला आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा