अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा
मडगाव, दि. ३० (प्रतिनिधी)- अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, देशातून या परीक्षेला बसलेल्या ११ लाख विद्यार्थ्यांमध्ये गोव्याचा साईश कापडी हा अकरावा आला आहे. साईश हा आर्यन स्टडी सर्कलमध्ये प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी असून, या यशाबद्दल त्याचे व संस्थाचालक व्यंकटेश प्रभुदेसाई यांचे अभिनंदन केले जात आहे.
रसायनशास्त्र, गणित आणि भौतिकशास्त्र या तीन विषयांसाठी होणाऱ्या परीक्षेचे गुण ४३२ असून, साईश कापडी याने ३८८ गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळविले आहे. याच परीक्षेत निरज बोरकर हा १९० वा आला असून, त्यानेही आपली चमक दाखविली आहे. भार्गव जोशी, निखिल तावरा, निखिल सहकारी, साईश सरिन, अतुल हरिलाल, गणपती भट, अंतरिक्ष डिचोलकर, अमीत प्रभू या आर्यन स्टडी सर्कलच्या अन्य विद्यार्थ्यांनी याच परीक्षेत चांगले यश संपादन केले आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा