सावंतवाडी, दि. ४ (प्रतिनिधी)- शिरोड्याहून वेंगुर्ला येथे जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उभादांडा मोचेमाड येथील तीव्र वळणावर उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले. यातील चार जण जागीच ठार झाले तर एकाला इस्पितळात नेत असताना मृत्यू
आला. सदर अपघात आज सायंकाळी ५ वा. घडला.
याविषयी सविस्तर हकीगत अशी की मूळ विजापूर येथील हे लमाणी मजूर स्लॅबचे काम आटोपून ट्रॉली क्र. केए २८ टी ८६२१ ने वेंगुर्ला येथे जात होते. उभादांडा येथील वळणावर चालकाचा तोल गेल्याने ट्रॉली उलटली. या अपघातात चालक हनुमान शेट्टी (२५), विजय चव्हाण (३ वर्षे), अबित राठोड ( दीड वर्ष), अमीत चव्हाण (२ वर्षे) तर पाचव्या मृताचे नाव समजू शकले नाही. यापैकी चार जण जागीच ठार झाले तर पाचवा इस्पितळात नेत असताना मरण पावला. ट्रॉलीत एकूण २७ जण होते. पैकी २२ जण गंभीर जखमी झाले. त्यातील ६ जण अत्यवस्थ आहेत. जखमीना शिरोडा, वेंगुर्ला व गोमेकॉ पणजी येथील इस्तितळात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा वेंगुर्ले पोलिस अधिक तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा