Thursday, 20 August 2009

नंबर प्लेट सक्तीविरोधात चतुर्थीनंतर आंदोलन तीव्र

भाजपची घोषणा० मडगावात मोर्चा
मडगाव, दि. १९ (प्रतिनिधी) : कॉंग्रेस सरकारने प्रत्येक क्षेत्रात लुटालुट आरंभली असून वाहनांसाठीची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट सक्ती हे त्याचे चालते बोलते उदाहरण आहे, असा घणाघाती आरोप करून ही क्रमांकपट्टी सक्ती रद्द केल्याखेरीज भाजप स्वस्थ बसणार नाही व गणेशचतुर्थीनंतर आंदोलन तीव्र करून ते संपूर्ण गोव्यात विस्तारीत केले जाईल, असा इशारा आज येथे या प्रश्र्नावर काढलेल्या मोर्चाअखेर झालेल्या जाहीर सभेतून भाजप नेत्यांनी दिला.
खासदार व भाजप अध्यक्ष श्रीपाद नाईक व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली लोहिया मैदानावरून निघालेला हा मोर्चा नव्या बाजार रस्त्यावरून पालिकेला वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयापाशी आला व त्यांनी या वाहन क्रमांकपट्टी सक्तीविरुध्द जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर केले. त्यात व्यापक जनहिताच्या दृष्टीने ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
नंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच या मोर्चाचे रुपांतर जाहीर सभेत झाले, त्यात खासदार श्रीपाद नाईक, विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर, आमदार दामू नाईक, महादेव नाईक, महिला मोर्चाच्या अध्यक्ष कृष्णी वाळके,पक्षाचे दक्षिण गोवा अध्यक्ष विनय तेंडुलकर,नरेंद्र सावईकर यांची भाषणे झाली.
सदर हायसिक्युरिटी नंबर प्लेट सक्ती हाच मुळी कोट्यावधींचा घोटाळा असून त्यात बडे बडे गुंतलेले आहेत, अशा घोटाळ्यातून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारणारे आमआदमीचे काय कल्याण करणार, असा सवाल वक्त्यांनी केला.आकाशाला भिडणाऱ्या महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेला असून त्यातच सरकार त्याला अशाप्रकारे लुटू लागले तर तो या सरकारला धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाही असे सांगून वक्त्यांनी सरकार व त्यातील मंत्र्यांच्या अनेक गैरकृत्यांचा पाढा वाचला.
काल सत्ताधारी पक्षाच्या युवा शाखेने जे निदर्शनांचे नाटक केले आहे ती लोकांची एकप्रकारे केलेली दिशाभूल आहे. ते जर मागणीशी प्रामाणिक असतील तर त्यांनी मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्या राजिनाम्याची मागणी करायला हवी असे प्रतिपादिले गेले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत या पटट्या रद्द करण्याचे आश्र्वासन दिलेले असताना अजून त्यांचे काम कसे चालू आहे,असा सवालही केला गेला.
मोर्चात श्रीपाद नाईक व मनोहर पर्रीकर यांच्या समवेत बहुतेक भाजप आमदार व माजी आमदार राजेंद्र आर्लेकर व प्रकाश वेळीप सहभागी झाले होते.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा