Tuesday, 18 August 2009

बलात्कारप्रकरणी राष्ट्रपतींचे चार सुरक्षा रक्षक दोषी

नवी दिल्ली, दि. १७ - सामुहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकातील चार बॉडीगार्डना दोषी ठरवण्यात आले. दोषींपैकी दोघांवर अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप सिद्ध झाला तर बाकीच्या दोघांवर गुन्ह्यासाठी मदत केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे.
दिल्ली विद्यापीठात शिकणारी १७ वर्षाची एक मुलगी मित्रासोबत राष्ट्रपती भवनाजवळ असलेल्या बुद्ध जयंती उद्यानात आली होती. त्यावेळी राष्ट्रपतींच्या सुरक्षा पथकातील चौघांनी तिला पळवून नेले होते. पळवल्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्याजवळचे दागिने आणि पैसेही बॉडीगार्डनी चोरले होते. या प्रकरणी सहा वर्षानंतर कोर्टाने सोमवारी निकाल दिला. दोषींना २२ ऑगस्ट रोजी शिक्षा देण्यात येणार आहे. सेशन कोर्टाचे अतिरिक्त जज सरवारिया यांनी अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणे आणि तिच्याजवळची संपत्ती लुटणे या प्रकरणी हरप्रीत सिंग आणि सत्येंदर सिंगला दोषी ठरवले. तर कुलदीप सिंग आणि मनीष कुमारला गुन्ह्यासाठी मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.
हरप्रीत आणि सत्येंदरला आयपीसीच्या सामुहिक बलात्कार कलम ३७६(२)(जी), दरोडा कलम ३९४, अपहरण कलम ३६६, गुन्हा करण्याचा एकसमान हेतू कलम ३४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले. कुलदीप सिंग आणि मनीष कुमारला दरोडा कलम ३९४, अपहरण कलम ३६६, गुन्हा करण्याचा एकसमान हेतू कलम ३४ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा