Tuesday, 18 August 2009

नंबर प्लेटविरोधात आज म्हापशात भाजपचा मोर्चा

पणजी,दि.१७(प्रतिनिधी)- "हायसिक्युरिटी नंबर प्लेट' च्या कार्यवाहीबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी विधानसभेत देऊनही वाहतूक खात्याकडून या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू ठेवण्यात आली आहे. सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा टाकणाऱ्या या जुलमी निर्णयाविरोधात आता भाजपने रस्त्यावर उतरण्याचे निश्चित केले आहे.
उद्या १८ रोजी हायसिक्युरिटी नंबर प्लेटच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भाजपकडून म्हापसा येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी ३ वाजता हा मोर्चा म्हापसा येथील श्री हनुमान मंदिराकडून सुरू होईल.म्हापशा शहरात फिरून तदनंतर तो कदंब बसस्थानकावरील साहाय्यक वाहतूक संचालकांच्या कार्यालयाबाहेर पोहचेल.तिथे या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.भाजप प्रदेशाध्यक्ष श्रीपाद नाईक हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत व विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांचीही उपस्थिती राहील.या मोर्चात उत्तर गोव्यातील भाजपचे आमदार,विविध पदाधिकारी,युवा मोर्चा,महिला मोर्चा सहभागी होणार आहे.सरकारने अत्यंत घाईगडबडीत घेतलेला हा निर्णय अत्यंत अविचारी पद्धतीने घेतला असून त्यामुळे सामान्य लोकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.यापूर्वी वाहतूकदारांनी या निर्णयाला विरोध केला आहेच, त्यामुळे भाजपच्या या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे व हा मोर्चा यशस्वी करून सरकारला हा निर्णय तात्काळ रद्द करण्यास भाग पाडावे,असेही आवाहन यावेळी सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांनी केले.
दरम्यान, लगेच १९ रोजी मडगाव येथे तशाच प्रकारचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा दुपारी ३ वाजता लोहिया मैदानावरून सुरू होणार असून सर्वांनी एकत्रित व्हावे,अशी माहितीही श्री.पर्वतकर यांनी दिली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा