विश्वजित धमकीप्रकरण
पणजी, दि. ३ (प्रतिनिधी) - जुने गोवे पोलिस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास गावडे यांच्या विरोधात दाखल केलेली अवमान याचिका उद्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सुनावणीसाठी घेतली जाणार आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे सांगूनही आरोपपत्र दाखल केले नसल्याचा मुद्दा उपस्थित करून ऍड. आयरिश रॉड्रिगीज यांनी गोवा खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे. गोवा खंडपीठाने यापूर्वी निरीक्षक गावडे यांना नोटीस बजावली आहे.
२३ सप्टेंबर रोजी सरकारी वकिलाने आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यावेळी निरीक्षक गावडे न्यायालयात हजर होते. परंतु, त्यानंतर आरोपपत्र दाखल न करता थेट त्या प्रकरणाची फाईलच बंद करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाल्याचा मुद्दा उपस्थित करून ऍड. रॉड्रीगीज यांनी अवमान याचिका दाखल केली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा