बागहा(बिहार), दि. ११ : अभिनेता व सपाचे सरचिटणीस असलेले संजय दत्त यांच्या प. चंपारण जिल्ह्यातील एका रॅलीत चेंगराचेंगरी झाली. संजय दत्तचे भाषण ऐकण्याऐवजी त्यांना पाहणाऱ्यांनीच उभे केलेले बॅरिकेड तोडल्यानंतर गोंधळाला एकच सुरुवात झाली व त्याचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले.
संजय दत्त यांना बघण्यासाठी त्यांचे शेकडो चाहते येथील उपविभागीय मुख्यालयाच्या मैदानावर जमले होते. संजूबाबा उर्फ मुन्ना भाईला बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये रेटारेटी सुरू झाली. अशातच गर्दीच्या रेट्यापुढे उभारण्यात आलेले लाकडी अडथळे कोसळून पडले. काहींनी तर उभारण्यात आलेल्या या बॅरिकेडवरच उभे राहण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढू लागल्याने पोलिसांनी स्थिती आपल्या हाती घेतली व परिणामी चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या लाठीमारापासून वाचण्यासाठी लोक एकमेकांना तुडवून जात होते. यामुळे काही लोकांना दुखापती झाल्या.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा