Wednesday, 14 January 2009

सत्यमप्रकरणी चौकशी अहवाल केंद्राला सोपविला

हैदराबाद/दिल्ली, दि. १३ : सत्यम कॉम्प्युटर कंपनीतील घोटाळ्याच्या कंपनी निबंधकांनी (आरओसी) केलेल्या प्रारंभिक चौकशीचा अहवाल केंद्राला सोपविण्यात आला आहे. दरम्यान, या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारने फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या कार्यालयाला (एसएफआयओ) सत्यम महाघोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.
आरओसी हैद्राबादने काल उशीरा रात्री प्राथमिक चौकशी अहवाल कंपन्यांची प्रकरणे हाताळणारे मंत्री प्रेमचंद गुप्ता यांना सोपविला होता.
एसएफआयओ सुरुवातीपासूनच आरओसीला चौकशीसाठी मदत करीत असले तरी त्यांना अधिकृतपणे चौकशीची जबाबदारी अद्याप सोपविण्यात आली नव्हती. मात्र, मंगळवारी सरकारने एसएफआयओकडे चौकशीची जबाबदारी सोपविली. सत्यम महाघोटाळ्याच्या चौकशीत आरओसीला सहकार्य करण्यासाठी शुक्रवारी कंपन्यांचे प्रकरण हाताळणाऱ्या मंत्रालयाने सल्लागार व निरीक्षकांचा समावेश असलेल्या एसएफआयओ पथकाला हैद्राबाद येथे पाठविले होते हे विशेष.
एसएफआयओ गंभीर स्वरूपाच्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करीत असते. हे कार्यालय तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सरकारला सोपविणार असल्याची माहिती कंपनी प्रकरणांचे मंत्री प्रेमचंद गुप्ता यांनी दिली. एसएफआयओ संपूर्ण सत्यम घोटाळ्याची चौकशी करण्यासोबतच संचालक, प्रवर्तक, ऑडिटर्स यांच्या भूमिकेचीही चौकशी करणार असल्याचे ते म्हणाले. नियंत्रक आणि नियमन यांच्या भूमिकेबाबत बोलताना गुप्ता म्हणाले की, या मुद्यावर सरकार गांभीर्याने विचार करीत असून सत्यमची कार्यकारिणी आणि संचालकांच्या नियुक्तीबद्दल कंपन्यांची प्रकरणे हाताळणारे सचिव अनुराग गोयल यांनी सत्यमच्या कार्यकारिणीसोबत नियमितपणे संपर्क ठेवला असून आवश्यकता भासल्यास त्वरित यावर निर्णय घेतला जाईल.
एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख, नॅस्कॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक आणि सॅटचे माजी पीठासीन अधिकारी सी. अच्युतन यांचा समावेश असलेल्या तीन सदस्यीय मंडळाचे शुक्रवारी सरकारने गठन केले होते.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा