एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर
मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी) : गाळी नेसाय, सां जुझे आरीयल येथील दोन बहिणींनी विषारी झाडाची फळे खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात फ्रान्सिस्का पास्कोल मावरील (५९) हिचे निधन झाले; तर लुईसा पास्कोल मावरील (५०) हिची प्रकृती गंभीर असल्याने बांबोळीत "गोमेकॉ'मध्ये दाखल करण्यात आले आहे. आत्महत्यामागील कारण समजू शकले नाही. तथापि, आर्थिक विवंचनेतून त्यांच्यावर ही दुर्दैवी वेळ ओढवल्याचे सांगण्यात आले.
दोन्ही बहिणी अविवाहीत असून एकाच घरात राहात होत्या. त्यापैकी लुईसा ही अपंग आहे. फ्रान्सिस्काची शवचिकित्सा करण्यात आली आहे. मायणा कुडतरी पोलिसांत या घटनेची नोंद झाली आहे. या दोघी बहिणींना एक भाऊ असून तो वास्कोत कामाला असतो. तोच या दोन्ही बहिणीना मदत करीत असल्याची माहिती मिळाली आहे.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा