Wednesday, 21 January 2009

अडीच लाखांचे दागिने बायणा वास्कोत लंपास

वास्को, दि.२० (प्रतिनिधी) : बायणा वास्को येथील "पवित्रा ज्वेलर्स' या सराफी दुकानातून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखाचा माल लंपास केला आहे. बंद दुकानाच्या व्हेंटिलेटरद्वारे आत प्रवेश करून चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी अजून कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.
ही घटना काल रात्री ८ ते आज सकाळी ७ या दरम्यान घडली. सुदांनशिव चंद्रधार काल रात्री आपले दुकान बंद करून गेल्यानंतर आज सकाळी पुन्हा दुकान उघडण्यासाठी ते परतले तेव्हा दुकानाचे व्हेंटिलेटर उघडण्यात आल्याचे लक्षात आले. लगेच आत जाऊन दुकानातील सामानाची तपासणी केली असता सोन्याचे व चांदीचे दागिने, मोती व इतर सामान मिळून एकूण अडीच लाखाचा माल चोरण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. नंतर त्यांनी लगेच वास्को पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यावर पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून पंचनामा केला. निरीक्षक सागर एकोस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव नाईक तपास करीत आहेत.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा