Wednesday, 14 January 2009

'नवमतदाता संमेलना'साठी भाजयुमोतर्फे जागृती मोहीम, ११ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सर्व तालुक्यांत संमेलने

पणजी, दि.१३(प्रतिनिधी) : युवाशक्तीचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकांनद यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा मोर्चातर्फे देशव्यापी "नवमतदाता जागृती अभियान' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजयुमो गोवा विभागानेही या अभियानाची जोरदार तयारी सुरू केली आहे. १२ ते २५ जानेवारी दरम्यान,या संमेलनाबाबत व्यापक जागृती मोहीम हाती घेण्यात येणार असून ११ ते २५ फेब्रुवारी या काळात सर्व अकराही तालुक्यात नवमतदाता संमेलन आयोजित केले जाणार असल्याची घोषणा आमदार दामोदर नाईक यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाचे कार्यकारिणी सदस्य तथा कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे प्रभारी म्हणून निवड झालेल्या आमदार दामोदर नाईक यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजयुमोचे अध्यक्ष आशिष शिरोडकर हजर होते. राष्ट्र उभारणीत युवाशक्तीची भूमिका महत्त्वाची आहे.१८ ते २५ या वयोगटातील तरूणपिढी ही सुशिक्षित आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास व आपल्या मतदानाच्या हक्काचे महत्त्व पटवून दिल्यास देशात खरोखरच परिवर्तन घडू शकते. त्यामुळे स्वार्थी राजकारण्यांच्या आमिषांना बळी न पडता या युवापिढीने आपले मतदान केले तर देशाला सुशासन प्राप्त होण्यास अजिबात अडथळा येणार नाही. या उद्देशानेच युवापिढीला मार्गदर्शन करून त्यांची ताकद त्यांना पटवून देण्यासाठी हे अभियान सुरू केल्याचे नाईक म्हणाले.
"मत हा केवळ हक्क नव्हे तर जबाबदारी आहे' हा मंत्र गावोगावी युवा पिढीला पोहचवला जाईल. या कामासाठी भाजयुमोचे अध्यक्ष आशिष शिरोडकर व त्यांचे सहकारी कामाला लागले असून विविध मतदारसंघात बैठका,पत्रकेवाटप तथा जागृती सभा आयोजित करून या संमेलनात सहभागी होण्यासाठी युवकांना आवाहन करणार आहेत. लोकसभा निवडणुका जवळ पोहचल्याने या परिवर्तनाची सुरुवात या निवडणुकीपासून सुरू व्हावी या उद्देशानेच हे अभियान भाजपतर्फे देशभरात राबवण्यात येणार असल्याचेही दामोदर नाईक यांनी स्पष्ट केले.
गोव्यात १८ ते २५ वयोगटातील सुमारे १ लाख ६५ हजार मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात या मतदारांची संख्या चार ते साडेचार हजार आहे, त्यामुळे या लोकांनी मनात घेतल्यास कोणताही बदल होणे शक्य आहे. येत्या काही काळात सर्वांत युवा देश म्हणून आपल्या देशाची ओळख होणार असल्याने त्यामुळे राष्ट्रउभारणीची धुरा आता याच नवमतदात्यांनी स्वतःच्या खांद्यावर वाहण्याची गरज आहे,असेही नाईक यांनी सांगितले.
गोव्यात राजकीय नेत्यांच्या आमिषांना बळी पडण्यात युवकांची संख्या जास्त असल्याने त्यांना योग्य लोकांकडून मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या मानसिकतेत बदल होणे शक्य असल्याचे आशिष शिरोडकर म्हणाले. भाजयुमोने त्यासाठी पुढाकार घेतला असून हे अभियान यशस्वी होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा