Thursday, 15 January 2009

संजयच्या निर्णयाने प्रिया दत्त नाराज, उभयतांत मतभेद नसल्याचा खुलासा

मुंबई, दि. १४ : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तने समाजवादी पक्षाशी घरोबाकेल्याने आपण निराश झालो, मात्र हा निर्णय घेताना त्याने आपल्याशी चर्चा केली नसून हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. यामुळे आमचे कौटुंबिक संबंध बिघडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काही प्रसारमाध्यमांनी संजयचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित केले असे मत उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या खासदार प्रिया दत्त यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
आमच्या कुटुंबीयांचे कॉंग्रेस पक्षाशी फार जुने संबंध आहेत. त्यामुळे संजयही कॉंग्रेस पक्षासाठी काम करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संजय दत्तची पत्नी मान्यता हिच्यासंदर्भात मात्र काहीही बोलण्यास प्रिया दत्त यांनी नकार दिला. काहीही झाले तरी आम्ही सर्व एक आहोत आणि यापुढे राहू असे सांगत,संजयने राजकारणाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे असे त्या म्हणाल्या.
दरम्यान संजय दत्त याला समाजवादी पक्षातर्फे तिकीट दिले जाणार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस अमरसिंग यांनी नुकतेच जाहीर केले होते.एवढेच नव्हे तर संजयला तांत्रिकदृष्ट्या लखनौमधून निवडणूक लढवता आली नाही तर त्याची पत्नी मान्यता हिला निवडणूक तिकीट दिले जाईल. त्या परिस्थितीत मग संजय दत्त समजावादी पक्षाच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळेल, असेही अमरसिंग यांनी स्पष्ट केले होते.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा