Tuesday, 20 January 2009

मुंबई हल्ला चौकशीच्या प्रगतीची
पाककडून भारताला माहिती

इस्लामाबाद, दि. १९ - पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांनी आज भारताचे उच्चायुक्त सत्यव्रत पाल यांची भेट घेतली. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या पाकने सुरू केलेल्या चौकशीच्या प्रगतीबाबत त्यांच्यात चर्चा झाली.
मलिक यांनी, मुंबईतील हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानने केलेल्या तीन सदस्यीय समितीच्या गठनाची माहिती भारतीय उच्चायुक्तांना दिली. भारताने दिलेल्या माहितीच्या आधारावर पाकिस्तानकडून ही चौकशी केली जाते आहे, असे अधिकृत सूत्रांकडून कळते.
पाकिस्तानी चौकशीतून बाहेर येणारी तथ्ये भारतासमोर मांडली जातील, असे मलिक यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. जास्त माहिती त्वरित उपलब्ध होऊ शकली नाही.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा