Thursday, 4 December 2008

शिवाजी टर्मिनसला पुन्हा बॉंब सापडल्याने खळबळ

मुंबई, दि. ३ : शिवाजी टर्मिनस येथे आठ किलो आरडीएक्स असलेला बॉम्ब सापडल्यामुळे मुंबईत पुन्हा खळबळ माजली. पार्सल विभागामधील हा बॉम्ब पोलिसांनी तात्काळ निकामी केला.
आज संध्याकाळी मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरुन पार्सल विभागात आठ किलो वजनाचा एक बॉम्ब सापडला. तात्काळ हालचाल करुन रेल्वे पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि बॉम्ब निकामी केला. ही माहिती रेल्वे पोलिस आयुक्त अशोक शर्मा यांनी दिली.
घटनास्थळी मुंबई अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस, अग्नीशमन दल व बॉम्ब निकामी पथकाने अतिशय सावधानपूर्वक हा बॉम्ब निकामी केल्यामुळे पोलिसांनी व प्रवासी नागरिकांनी निःश्वास सोडला.

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा