पणजी, दि. ९ (प्रतिनिधी): मूर्तितोडफोड प्रकरणी अटक केलेला संशयित कवेश गोसावी याची नार्को चाचणी करण्याची तयारी गुन्हा अन्वेषण विभागाने सुरू केली आहे. यासाठी न्यायालयाची परवानगी मागितली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोसावी याला संशयाने पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत त्यांनी काही महत्त्वाची माहिती पोलिसांना पुरवली असून त्याची पडताळणी करण्यासाठी ही चाचणी केली जाणार आहे. तसेच त्याच्याकडून अजून माहिती बाहेर काढण्यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
गेल्या एका महिन्यापासून मूर्तींची मोडतोड करण्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण गोवा पिंजून काढला. यावेळी त्यांना काही महत्त्वाची माहिती हाती लागली. तसेच या टोळीचा मुख्य सूत्रधार तुरुंगात असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पाच महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर पडलेल्या गोसावी याच्यावर पोलिसांनी पाळत ठेवली होती. यावेळी पोलिसांना गोसावी याचे वर्तणूक संशयास्पद असल्याचे आढळल्याने त्याला परवा पहाटे गुन्हा अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले होते.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा