दिफू(आसाम), दि.२ : पूर्वात्तर भागातल्या अतिरेक्यांच्या एका गटाने, आसामच्या करबी अंग्लॉंग जिल्ह्यातील दिफू येथे एका प्रवासी ट्रेनमध्ये घडवून आणलेल्या बॉंबस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून ३५हून जास्त व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
ट्रेनच्या साधारण दर्जाच्या डब्याच्या दाराशीच लावलेल्या या बॉंबचा सकाळी ८ वाजता स्फोट झाला असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. गाडी दिफू रेल्वेस्थानकाजवळ येत असतानाच टायमर लावलेल्या बॉंबचा स्फोट झाला. या स्फोटानंतर काही तासातच केएलएनएलएफ अतिरेक्यांनी जिल्ह्याच्या दालामारा भागात स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला चढवला. एका हिंदी भाषिक जोडप्याला त्यांनी गोळ्या घातल्या. रेल्वे स्थानकावर सापडलेले स्फोट न झालेले काही बॉंब पोलिसांनी निकामी केले आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा