Sunday, 19 October 2008

मूर्तिभंजन प्रकरण पोलिसांच्या विशेष पथकाची स्थापना

पणजी,दि.१८ (प्रतिनिधी): राज्यात होणाऱ्या मूर्तिभंजन प्रकरणांचा छडा लावण्यात अपयशी ठरलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारला वाढत्या जनक्षोभापुढे आज अखेर नमते घेणे भाग पडले. धार्मिक स्थळांच्या मोडतोड व मूर्तिभंजन प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष पोलिस पथकाची स्थापना करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी केली.
आज पणजी येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी गृहमंत्री रवी नाईक,मुख्य सचिव जे.पी. सिंग,पोलिस महानिरीक्षक किशनकुमार व पोलिस महासंचालक ब्रार उपस्थित होते. गुन्हा शाखेचे अधीक्षक मंगलदास देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक स्थापन करण्यात आले आहे. प्रामुख्याने केवळ धार्मिक स्थळांवर झालेल्या हल्ल्यांची सखोल चौकशी करण्याचे काम त्यांना सोपवण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारच्या बदनामीचा कट
राज्यातील हिंदू लोक विद्यमान सरकारच्या राजवटीत सुरक्षित नाहीत,असा आभास निर्माण करण्यासाठी सुनियोजितपणे अशा प्रकारचे मंदिर तोडफोडीचे प्रकार सुरू असल्याचा संशय मुख्यमंत्री कामत यांनी व्यक्त केला.कुंकळ्ळी येथील घुमटी मोडतोड प्रकरणी एका कर्नाटकातील व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे व त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे,असे असतानाही सोमवारी २० रोजी गोवा बंदची दिलेली हाक ही केवळ धार्मिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न आहेत.असा आरोप त्यांनी केला. कायदा कुणालाही हातात घेता येणार नाही. स्वेच्छेने जे कुणी लोक या बंदात सामील होतात त्याबद्दल हरकत नाही परंतु लोकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास पोलिस कारवाई करण्यास मोकळे आहेत,असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उद्योजक, दुकानदार, व्यावसायिक, वाहतूकदार व सर्वसामान्य जनता यांना पूर्ण संरक्षण देण्यात येईल,असेही ते म्हणाले. या संपूर्ण पत्रकार परिषदेत गृहमंत्री रवी नाईक यांनी मात्र चकार शब्दही काढला नाही व त्यामुळे पत्रकारही अचंबित झाले.
------------------------------------------------------------
... तर एक लाखाचे इनाम
मूर्तिभंजनासारख्या प्रकरणांबाबत खात्रीलायक माहिती देणाऱ्यांस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याचीही घोषणा यावेळी त्यांनी केली. ही माहिती गुन्हे शाखेचे अधीक्षक,पोलिस महानिरीक्षक किंवा पोलिस महासंचालकांकडे देता येईल. याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाणार आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा