Saturday, 25 October 2008

मच्छीमारी नौका उलटून बेतूलला एकजण बुडाला, अन्य दोघे बचावले; वादळी लाटेचा तडाखा

मडगाव, दि. २४(प्रतिनिधी): बेतूल समुद्रात काल उत्तररात्री एक मच्छिमारी नौका उलटून झालेल्या दुर्घटनेत उत्कर्ष पारोडकर (२८) हा बेपत्ता झाला असून त्याच्याबरोबर असलेले अन्य दोघे जखमी झाले. बुडालेल्या उत्कर्ष याचा शोध आज (शुक्रवारी) सायंकाळपर्यंत सुरू होता. तथापि, त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
उत्कर्ष (बाप्सोरा-बेतूल), दीपक पेडणेकर (२८ ) व नयन पेडणेकर (३२) (कारवार)े असे तिघेही काल सायंकाळी होडी घेऊन बेतूल बंदरातून मच्छिमारीसाठी गेले होते. मच्छिमारी करून रात्री दीडच्या सुमारास परतताना एका मोठ्या लाटेचा तडाखा बसून त्यांची होडी उलटली. त्यामुळे तिघेही पाण्यात फेकले गेले. त्यापैकी दीपक व नयन हे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले. त्यात ते जखमीही झाले. उत्कर्ष मात्र बुडाला.
दीपकच्या डोक्याला मार बसला असून त्याच्यावर खाजगी हॉस्पितळात उपचार सुरू आहेत. नयन याला प्राथमिक उपचारांनंतर घरी जाऊ देण्यात आले. कुंकळ्ळी पोलिस तपास करीत आहेत. यंदांचा मच्छिमारी हंगाम सुरू झाल्यानंतरची अशा प्रकारची ही पहिलीच दुर्घटना आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा