नवी दिल्ली, दि. ४ : भारतीय झटपट क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला क्रीडा जगतातील सर्वोच्च बहुमानाने म्हणजेच राजीव खेलरत्न पुरस्कारने गौरवण्यात येणार आहे.
"फ्लाईंग सिख' अशी उपाधी मिळवलेले एकेकाळचे नामांकित ऍथलिट मिल्खासिंग यांच्या अध्यक्षतेखालील खास समितीने आज येथे धोनीच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. क्रिकेट जगतात सचिन तेंडुलकर याच्यानंतर हा मानाचा पुरस्कार पटकावलेला धोनी केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. अर्थात, याबाबतची अधिकृत घोषणा येत्या २० तारखेनंतरच करण्यात येणार आहे. क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राहुल द्रविड युवराज सिंग यांना ऐन भरात असतानाही हा पुरस्कार मिळाला नव्हता हे विशेष.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा