Tuesday, 29 April 2008

बेकायदा शॅक्सप्रकरणी दक्षता घेण्याचे आदेश

पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): राज्याच्या समुद्र किनाऱ्यांवरील बेकायदा शॅक्स आणि सनबेड हटवल्याचे प्रतिज्ञापत्र आज पर्यटन खात्याने सादर केल्यानंतर तेथे यापुढे बेकायदा शॅक्स आणि सनबेड उभे राहणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल, अशा हमीचे देणारे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार व गोवा खंडपीठाचे न्या. एन. एन. ब्रिटो यांच्या खंडपीठाने दिला. मुख्य सचिव, पर्यटन खाते, पोलिस खाते, वीज खाते, महसूल खाते तसेच समुद्री पट्ट्यातील पंचायतींना एका आठवड्यात हे प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे.
गोव्यातील सागरी पट्ट्यात बेकायदा उभे राहिलेल्या "शॅक्स'ना वीजजोडणी, अन्न व औषध खाते, आरोग्य खाते तसेच त्याठिकाणी दारू विक्री करण्यासाठी अबकारी खात्याचा परवाना कसा मिळाला, असा प्रश्न करून या शॅक्सना हे परवाने देणाऱ्या सर्व खात्यांतील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. याबाबत आदेश देऊनही कारवाई केली जात नसल्याने पर्यटन खात्याच्या संचालकांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यावरील सर्व शॅक्स आणि सनबेड हटवण्यात आले होते.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा