मोरजी, दि. २९ (वार्ताहर): विवाहाला केवळ एक दिवस उरलेला असतानाच मोरजी कोतोळेवाडा येथील
एक तरुणी आज (दि.२९) सकाळी ८ पासून बेपत्ता असल्याची तक्रार पेडणे पोलिसांत नोंदवण्यात आली आहे.
त्या तरुणीचा विवाह उद्या (दि. ३०) रोजी आसगाव येथील एका युवकाबरोबर विवाह निश्चित झाला होता. तथापि, त्यापूर्वीच सदर तरुणी सकाळी ८ पासून बेपत्ता झाल्याने गावात खळबळ माजली आहे. ती येथीलच एका युवकाबरोबर पळून गेल्याचा संशय व्यक्त होत आहे. उपलब्ध माहितीनुसार ज्या युवकाबरोबर ती पळून गेली त्या युवकाचे दोन दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्यामुळे हे प्रकरण गुंतागुतीचे बनले आहे. गावात ते चर्चेचा विषय बनले आहे. ज्या युवकाबरोबर ती पळून गेली तो युवकही सकाळपासून घरातून बेपत्ता झाला आहे. पोलिस तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment
आपली प्रतिक्रिया नोंदवा