Wednesday, 5 March 2008

-----------------
जुवारी पुलाचा तडा तपासणार
पणजी, दि. ५ (प्रतिनिधी)ः जुवारी पुलासंदर्भात लोकांच्या मनात उपस्थित झालेल्या शंकेच्या निरसनासाठी सा.बां. खात्यातर्फे सदर कथीत तडा तपासला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कामत यांनी दिली.
दै. "गोवादूत" मधून प्रसिद्ध झालेल्या या वृत्ताची आपल्याला आजच खबर मिळाल्याचे ते म्हणाले. जुवारी पुलाची वेळोवेळी तपासणी केली जाते त्यामुळे हा तडा धोकादायक असण्याची शक्यता कमी असल्याची माहिती देत तो सर्वसामान्य बांधकामाचा तडा असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
------------------------------------

No comments:

Post a Comment

आपली प्रतिक्रिया नोंदवा