Friday, 21 March 2008

गडगडाटासह अनेक भागांत जोरदार पाऊस

पणजी, दि. २१ (प्रतिनिधी): राज्यात आज सायंकाळी अवेळी कोसळलेल्या पावसाने पणजी, फोंडा, मडगाव, कोणकोण येथे लोकांना बरेच झोडपून काढले. वास्को, खोर्ली व अन्य ठिकाणी मात्र पाऊस कमी पडल्याने होळी पेटविण्याच्या उत्सवात मोठी बाधा आली नाही. काही ठिकाणी ईद मिरवणूक व गुड फ्रायडेच्या प्रार्थनासभांना निघालेल्यांची तारांबळ उडाली.
होळीनिमित्त पिंपळकट्टयाजवळ आयोजित कार्यक्रमाचाही पावसाने विचका करून टाकला. पणजीत "गुड फ्राईडे'च्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांच्या मिरवणुकीच्या ऐनवेळी पावसाने हजेरी लावल्याने पाऊस थांबेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागली.
आमच्या फोंडा प्रतिनिधीने कळवल्यानुसार, शहर आणि तालुक्यातील विविध भागात वळवाच्या पावसामुळे लोकांची तारांबळ उडाली. या भागात विजेचा लखलखाट होत जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुस्कारा सोडला. अचानक पडलेल्या ह्या पावसामुळे शहरात आलेल्या लोकांची तारांबळ उडाली. दुचाकी वाहन चालकांची सुध्दा गैरसोय झाली.
गावडोंगरीच्या वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार काणकोण तालुक्यात दोन तास मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यामुळे लोकांना हैराण करून टाकले. गडगडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह सतत पडलेल्या पावसामुळे लोकांना बराच त्रास सहन करावा लागला.
संध्याकाळी ५ च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी अनेक दुचाकी चालक बाजारातच खूप उशिरापर्यंत पाऊस थांबण्याची वाट पाहत अडकून पडले. बाजारहाटानिमित्त आलेल्या नागरिकांचीही या अवेळी आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली.
मडगाव प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत पावसाची कोणतीच चिन्हे नव्हती व त्यामुळे कोणत्याही पूर्वतयारीविना बाहेर पडलेल्यांची या पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली. सर्वाधिक धांदल उडाली ती ईदचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या आया मुलांची . ही मंडळी पालिका उद्यानातील बालोद्यानात जमली होती अचानक आलेल्या पावसामुळे त्यांची तेथे भलतीच कोंडी झाली. दक्षिण गोव्याच्या अन्य भागातही विजा व गडगडाटासह पाऊस पडला.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा