Sunday, 12 June 2011

बाबा रामदेव यांना श्री श्री रविशंकर भेटले

सरसंघचालक, डॉ. कलाम यांचे उपोषण मागे घेण्याचे आवाहन
रामदेव यांच्याशी चर्चा सुरू नाही : मोईली

देहराडून, दि. ११ : भ्रष्टाचाराच्या मुद्यावर बेमुदत उपोषणावर बसलेले योगगुरू बाबा रामदेव यांची ‘आर्ट ऑङ्ग लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी आज पुन्हा भेट घेतली. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे बाबांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती श्री श्री रविशंकर यांनी केली आहे.
‘‘बाबा रामदेव यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मध्यस्थी करण्यास केंद्र सरकारने आपल्याला सांगितले नाही,’’असे श्री श्री रविशंकर यांनी हिमालयन रुग्णालयात बाबा रामदेव यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘‘केंद्र सरकारची तशी इच्छा असल्यास राष्ट्रासाठी काहीही करण्याची आपली तयारी आहे, ’’असेही श्री श्री रविशंकर यावेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, विश्‍व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनीही बाबा रामदेव यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
रामदेव यांची प्रकृती स्थिर
दरम्यान, हिमालयन रुग्णालयातर्ङ्गे देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या बाबा रामदेव यांची प्रकृती स्थिर आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी प्रकृती खालावल्यानंतर बाबा रामदेव यांना रुग्णालयात हलविण्यात आले होते. शुक्रवारी रात्री बाबा रामदेव यांचे ब्लड प्रेशर आणि पल्स रेट कमी झाला होता. मात्र, त्वरित औषधोपचार करून यावर नियंत्रण मिळविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे रामदेव यांच्यावर उपचार करणार्‍या वैद्यकीय पथकात समावेश असलेले डॉ. दीपक गोयल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रामदेव यांची प्रकृती स्थिर असली त्यांना अशक्तपणा जाणवत असून, बोलताना आणि बसताना त्रास होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, उपोषण करत असलेले बाबा रामदेव यांच्याशी सरकार कुठल्याही प्रकारे चर्चा करत नसल्याचे केंद्रीय कायदामंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी सांगितले आहे. बाबा रामदेव किंवा इतर कुणाशीही सरकारची कुठल्याही प्रकारे चर्चा सुरु नाही, असे मोईली यांनी बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. बाबा रामदेव यांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी सरकारने श्री श्री रविशंकर यांना मध्यस्थी करण्याची विनंती केल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मोईली यांनी हे स्पष्टीकरण दिले. श्री श्री रविशंकर यांनी आपल्याशी प्रथम बर्लिन येथून आणि त्यानंतर मायदेशी परतल्यानंतरही संपर्क केला होता. सध्या जे काही होत आहे त्याबाबत रविशंकर यांनी चिंता व्यक्त केली होती, असेही त्यांनी सांगितले. पितृछत्र हरवल्यानंतर पूजाअर्चा करण्यासाठी हरिद्वारला जात असल्याने बाबा रामदेव यांच्याशी होणार्‍या चर्चेत आपले नाव समाविष्ट करू का, असे श्री श्री रविशंकर यांनी मला विचारले होते आणि त्याला मी होकार दिला होता, असे मोईली यांनी सांगितले. श्री श्री रविशंकर हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून बाबा रामदेव यांच्याशी चर्चा करत आहेत का, असे वारंवार विचारल्यानंतर, मी कुठल्याही वादात पडू इच्छित नाही. त्यामुळे यावर मी काहीही बोलणार नाही, असे मोईली यांनी सांगितले.

1 comment:

  1. ice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा