Monday, 25 April 2011

सत्यसाईबाबांचे महानिर्वाण

- जगभरात शोककळा
- बुधवारी अंत्यसंस्कार
- दोन दिवस अंत्यदर्शन
- भक्तांचा जनसागर

पुट्टापार्थी, दि. २४ : केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगभरातील लक्षावधी लोकांचे श्रद्धास्थान असणार्‍या श्रीसत्यसाईबाबांची तब्बल महिनाभर आजारपणाशी झुंज दिल्यानंतर आज अखेर प्राणज्योत मालली. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या लक्षावधी अनुयायांवर दु:खाची कुर्‍हाड कोसळली असून आपला ङ्गार मोठा आधार हिरावल्याची भावना भाविकांचे हृदय पिळवटून काढते आहे. सत्यसाईबाबांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक मान्यवरांनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत. आगामी दोन दिवसपर्यंत त्यांचे पार्थिव पुट्टापार्थीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार असून बुधवारी अंत्यसंस्कार पार पडतील.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे सत्यसाईबाबांना २८ मार्च रोजी पुट्टापार्थी येथील श्रीसत्य साई इन्स्टिट्युट ऑङ्ग हायर मेडीकल सायन्सेस येथे दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून सातत्याने त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांचे अवयव एकापाठोपाठ एक निकामी होत होते. शेवटच्या दोन दिवसात त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देईनासे झाले होते. ते व्हेंटिलेटरच्या सहाय्यानेच श्‍वास घेत होते. प्रकृती अतिशय चिंताजनक झाल्याने डॉक्टरही चिंतेत होते. अखेर आज सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयासह सर्व अवयव निकामी झाल्याने त्यांचे देहावसान झाल्याचे इन्स्टिट्युटचे संचालक ए.एन. सङ्गाया यांनी सांगितले.
सोमवारी आणि मंगळवारी बाबांचा मृतदेह राज्यातील साई कुलवंत हॉल येथे अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. आज सायंकाळी ६ वाजेपासूनच हे अंत्यदर्शन सुरू झाले. बाबांचे कुटुंबीय आणि सत्य साई ट्रस्टने त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करायचे ठरविले आहे. त्याची निश्‍चित वेळ नंतर जाहीर केली जाणार आहे.
आपल्या मागे सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा ट्रस्टचा व्याप सोडून गेलेल्या सत्यसाईबाबांच्या निधनानंतर आता त्याचा वारसदार कोण आणि कोणाच्या माध्यमातून याचे कार्यान्वयन, नियंत्रण होणार, हा प्रश्‍न अजूनही निकालात निघालेला नाही.
या ट्रस्टवर खुद्द आंध्र सरकारचाही डोळा असून गेल्या काही आठवड्यांपासून राज्यातील सचिवस्तरीय अधिकारी पुट्टापाथींतच तंबू ठोकून बसले आहेत. दरम्यान, वारसदाराचा प्रश्‍न उपस्थित होताच आंध्र सरकारने बाबांच्या संस्थांचे, ट्रस्टचे काम आहे त्याच पद्धतीने चालू राहणार असल्याचे सांगितले. यात कोणताही वादाचा मुद्दा नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मान्यवरांच्या शोकसंवेदना
सत्यसाईबाबांच्या निधनाचे वृत्त समजताच आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन.किरण कुमार रेड्डी आणि राज्यपाल ई.एस.एल.नरसिंहन यांनी हैद्राबादहून तडक पुट्टापार्थी गाठले व बाबांचे अंत्यदर्शन घेतले.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी यांनी सत्यसाईबाबांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, बाबांचे शब्द आणि कृती हे भाविकांच्या हृदयात राहतील आणि नेहमीच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करतील.
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग
कोणत्याही धर्माचे लोक असले तरी त्यांना नैतिकता आणि अर्थपूर्ण जीवन कसे जगावे याची प्रेरणा बाबांनी दिली. असंख्य लोकांना आध्यात्माचा मार्ग दाखविणार्‍या सत्यसाईबाबांनी गेल्या पाच दशकांपासून लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्तीची ज्योत पेटविली. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील अनेक संस्थांची उभारणी करून त्यांनी सामाजिक कार्यातही आपली अमीट छाप सोडल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नितीन गडकरी
आध्यात्मिक जगात तसेच सामाजिक कार्यातही अजोड ठरलेले सत्यसाईबाबा यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कदाचित कधीच भरून न निघणारी असेल, अशी संवेदना भाजपाध्यक्ष नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
लालकृष्ण अडवाणी
आधुनिक भारतात स्वामी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती आणि महात्मा गांधी यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने, कार्याने लोकांना प्रभावित केले. तशीच आध्यात्मिक क्षेत्रात जी प्रतिष्ठा सत्यसाईबाबांनी मिळविली ती अजोड आहे. १९७५ ते ७७ या आणीबाणीच्या काळात मी बंगलोर कारागृहातून सुटल्यानंतर माझा साईबाबांशी संपर्क झाला. त्यानंतर मी सातत्याने कुटुंबियांसह त्यांच्या दर्शनाला जात असे. काही महिन्यांपूर्वी मी पुट्टापार्थी येथे गेलो होतो. बाबांचे ते माझे अखेरचे दर्शन ठरले, असे ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा
आपले संपूर्ण जीवन मनुष्यप्राण्याच्या कल्याणासाठी वेचणारे सत्यसाईबाबा हे एक उत्तुंग व्यक्ती होते. त्यांची आध्यात्मिक उंची अजोड होतीच. शिवाय त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यालाही तोड नाही, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
जयललिता
आपल्या असंख्य शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांच्या माध्यमातून मागील अर्ध्या शतकाहून अधिक काळ सत्यसाईबाबांनी समाजाची सेवा केली. त्यांचे जाणे हे मानवीयतेच्या दृष्टीने अतिशय हानिकारक ठरल्याचे अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी म्हटले आहे.

1 comment:

  1. We are uhe solid first platform for modeling newcomers to achieve there new dreams. The first to train and promote out models at our expense to avoid burden on them. Join the most popular agency if you modelling jobs in Delhi for female freshers, models, students, housewives aiming to start there modeling career. We are top modelling agency in Delhi offering modelling jobs in Delhi for upcoming female freshers or experienced models who want to join lingerie modeling agencies.


    modeling agencies in Delhi
    modeling agencies
    modeling jobs
    modeling auditions
    model coordinators
    modeling jobs in Delhi

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा