Friday, 21 August 2009

बेनझीर-इम्रानच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चेला ऊत

इस्लामाबाद, दि. २० - महाविद्यालयीन जीवनात ऑक्सफर्डमध्ये कधीतरी बेनझीर आणि इम्रान खान यांच्यात हळूवार प्रेमाचे नाते निर्माण झाले होते, असा उल्लेख एका पुस्तकात आल्याने पाकमध्ये खळबळ माजली असून, भुट्टोंच्या पीपल्स पार्टीने ही बाब साफ फेटाळून लावली आहे.
ख्रिस्तोफर स्टेनफोर्ड यांनी लिहिलेल्या इम्रान खानच्या चरित्रामध्ये इम्रान-बेनझीर यांच्यात बहरलेलं हे हळुवार नातं उलगडून दाखविण्यात आलं आहे. हे दोघे इतके जवळ आले होते की, त्यांनी एकमेकांशी शरीरसंबंधही ठेवले असावेत, असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे. हा दावा खुद्द इम्रान खानने खोेडून काढला असला तरी, बेनझीरवरील प्रेमाचा त्याने इन्कार केलेला नाही. इम्रानच्या आईने पुढाकार घेऊन या दोघांचं लग्न लावण्याचाही प्रयत्न केला होता. पण, तो यशस्वी झाला नाही, असेही लेखकाने म्हटले आहे.
२१ वर्षीय बेनझीर लेडी मार्गारेट हॉलमध्ये कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होत्या. तेव्हा इम्रानचं व्यक्तिमत्व त्यांना आवडलं होतं. इम्रानला "लॉयन ऑफ लाहोर' हे नाव बहुधा त्यांनीच सर्वप्रथम दिलं असावं, असंही स्टेनफोर्ड यांनी नमूद केलं आहे. किमान महिनाभर किंवा दोन महिने तरी बेनझीर-इम्रान एकमेकांच्या बरेच जवळ होते, हे काही प्रसंगांवरून स्पष्ट होतं. त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले असावे, असाही कयास लेखकाने लावला आहे. इम्रानचे अनेकींशी संबंध होते, असे ऑक्सफर्डमधील त्याच्या एका मित्राने म्हटले होते. त्या आधारे लेखकाने हा दावा केला असावा. पण, इम्रानने बेनझीरबाबत हा दावा फेटाळून लावला आहे. तिच्यावर प्रेम असल्याची बाब मात्र त्याने स्पष्ट नाकारलेली नाही.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने मात्र पुस्तकात नमूद असणारे उल्लेख साफ चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांच्या चरित्रावर आधारित पुस्तक विकण्यासाठी हा स्टंट करण्यात आल्याचे पीपल्स पार्टीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा