Sunday, 16 August 2009

दूध दोन रुपयांनी वाढणार? उद्याच्या बैठकीत निर्णय

फोंडा, दि. १५ (प्रतिनिधी): महाराष्ट्रात दुधाच्या दरात दोन रुपये वाढ करण्यात आल्याने गोव्यातील दूध उत्पादक शेतकरी सुद्धा दूध दरवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सहकारमंत्री रवी नाईक यांनी दूध दरवाढीसंबंधी सोमवार १७ रोजी बैठक घेण्याचे जाहीर केले असून सुमारे २ रुपये दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गोव्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून गेल्या कित्येक दिवसांपासून दूध दरवाढीची मागणी केली जात आहे. महाराष्ट्रात दोन रुपये दरवाढ करण्यात आल्याने गोव्यातील शेतकऱ्यांनीही दूध दरवाढीसाठी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालवला आहे.
वर्षभरापूर्वी गोव्यातील दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी गोवा डेअरीने गोव्यातील दूध उत्पादकांना दोन रुपयांची दरवाढ दिली होती. गोवा डेअरीकडून दुधाला मिळणारा दर परवडत नसल्याची उत्पादकांची तक्रार आहे. पशुखाद्य, औषधे यांच्या वाढत्या दरांमुळे दुग्ध व्यवसायात नफा होत नाही, अशी दूध उत्पादकांची तक्रार आहे. गोव्यातील दूध उत्पादकांनी आपल्या मागण्यांचे एक निवेदन वर्षभरापूर्वी सरकारला सादर केले होते. सदर निवेदनावर पशुसंवर्धन खात्याच्या सचिवांनी बैठक घेऊन खात्याला विविध सूचना केल्या होत्या. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने दूध उत्पादकांनी राय येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत आंदोलनाचा इशारा दिला होता.
गोव्यात दूध दरवाढीवर निर्णय घेण्याबरोबर दूध उत्पादकांना सुद्धा दरवाढ देण्याचे संकेत पशुसंवर्धनमंत्री रवी नाईक यांनी दिले आहेत. महाराष्ट्रात दुधाच्या दरवाढीमुळे गोवा डेअरीसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुमारे साठ टक्के दूध महाराष्ट्रातून आणले जात आहे, त्यामुळे लवकरात लवकर दूध दर वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा