Thursday, 27 August 2009

कुडतरी भागातही मोठे सेक्स रॅकेट

४ मुलींची सुटकाः चौघांना अटक - एकटा फरारी

मडगाव, दि. २६ (प्रतिनिधी) : या महिन्याच्या आरंभी फातोर्डा येथे भरवस्तीत सुरू असलेले सेक्स रॅकेट नष्ट केल्याची घटना ताजी असतानाच मडगाव पोलिसांनी, आज कुडतरी येथून चालवल्या जाणाऱ्या अशाच एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून चार अल्पवयीन मुलींना सोडविले; तर या व्यवसायात गुंतलेल्या चौघांना अटक केली. त्यांचा एक साथीदार फरारी आहे. या रॅकेटची व्याप्ती मोठी असून त्यात काही बडी मंडळी गुंतली असावीत, असा कयास व्यक्त केला जात आहे.
पोलिस उपअधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडतरी येथील एका हॉटेलाचा वापर या कामासाठी केला जात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार तेथे त्यांनी पाळत ठेवली होती. त्यांनी आज बनावट गिऱ्हाईक तेथे पाठवून एका मुलीबाबत सौदा केला व तिला घेऊन तो कोलवा येथे गेस्ट हाऊसमध्ये आला. त्या मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरून मायणा कुडतरी व मडगाव पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.
तेथे सापडलेल्या ४ मुली या गोव्याबाहेरील आहेत. त्यांना "अपना घर'मध्ये पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी अटक केलेल्यांत रामबहादूर, मोहिद्दीन (कर्नाटक), अकला हक (पश्चिम बंगाल), अँथनी डायस (कुडतरी-गोवा ) यांचा समावेश आहे तर अँथनी याचा एक सहकारी बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.
सदर हॉटेलचा वापर फक्त अशा मुलींना तेथे आणून ठेवण्यासाठी केला जात होता. अशा मुलींमागे प्रत्येकी पाच ते सहा हजार रु. घेतले जात होते व त्यांना ग्राहकाबरोबर पाठविले जात होते अशीही माहिती चौकशीत बाहेर आली आहे. अटक केलेल्यांविरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या महिन्याच्या आरंभी म्हणजेच १ ऑगस्ट रोजी रात्री पोलिसांनी फातोर्डा येथे नेहरू स्टेडियमलगत असलेल्या एका फ्लॅटवर छापा टाकून चार मुली, चौघे तरुण व एका दलालाला अटक केली होती. सदर मुलींत काही प्रतिष्ठितांच्या होत्या, त्यामुळे मडगावात खळबळ माजली होती. नंतर सदर फ्लॅटची मालकीण हा धंदा चालवत असल्याचा आरोप करून तेथील रहिवाशांनी तिला तेथून तडीपार करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे त्या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईही सुरू केली होती. तशातच आता हे प्रकरण उघडकीस आलेले आहे. काही वर्षांपूर्वी बायणा वेश्यावस्तीचा बीमोड केल्यानंतर तेथील वेश्या आपल्या मूळगावी नव्हे तर गोव्याच्या विविध शहरात बस्तान ठोकून आपला धंदा अशा प्रकारे चालवत असल्याचे आरोप होऊलागले आहेत.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा