Sunday, 16 August 2009

शिरोड्यात मूर्तींची विटंबना

तक्रार नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ; ग्रामस्थांचा रास्ता रोको
फोंडा, दि. १५ (प्रतिनिधी): बरभाट शिरोडा आणि विजार पंचवाडी येथील दोन देवस्थानांतील मूर्तींच्या विटंबनेचा प्रकार आज दि. १५ रोजी सकाळी उघडकीस आला आहे. या घटनेची तक्रार नोंद करून घेण्यास शिरोडा पोलिसांनी नकार दिल्याने तिथे गेलेल्या भाविकांना रास्ता रोको करून आपला संताप व्यक्त केला.
कुठ्ठाळी येथील मांगिरीष देवस्थानातील पालखीत ठेवण्यात येणारी मूर्ती चोरीस गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने मूर्तिभंजकांची टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे संकेत मिळत आहे. विजार पंचवाडी येथील श्री दत्त देवस्थानातील श्री दत्तमूर्ती, तुळशीचे वृंदावन तसेच देवस्थानातील प्रवेशद्वारांवरील चित्रांची नासधूस करण्यात आली आहे. बरभाट शिरोडा येथील श्री आपैकर देवस्थानाजवळील घुमटीची विटंबना करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घुमटीवर घाण्याने घाव घालून तिची नासधूस करण्यात आली. तसेच घुमटीजवळ ठेवण्यात येणारी समई जवळच्या शेतात फेकून देण्यात आली आहे.
या घटनांची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ माजली. बरभाट येथील घुमटीच्या विटंबनेसंबंधी तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांनी परत पाठवल्याने वातावरण तंग बनले. रास्ता रोकोची माहिती मिळताच फोंडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासकार्य सुरू केले.
यावेळी स्थानिक आमदार महादेव नाईक यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मूर्तिभंजनाच्या या दोन्ही घटनांचा त्यांनी निषेध केला. समाजातील एकोपा बिघडवण्याचा समाजकंटकांचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस यंत्रणेचे भय नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मूर्ती विटंबना करण्याच्या या दोन्ही घटनांचा नागरिकांनी तीव्र निषेध केला असून पोलिसांनी दोषींवर तातडीने कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा