Friday, 16 January 2009

दहशतवाद विरोधात पाकची कडक कारवाई

भारताच्या दबावतंत्राचा परिणाम
- तपासास सहकार्याची तयारी
- १२४ अतिरेक्यांना पकडले
- घातपाताची पाच केंद्रे बंद
- जमातच्या वेबसाइटला चाप

इस्लामाबाद, दि. १५ : भारताने आणलेल्या दबावापुढे झुकून पाकिस्तानने "जमात-उल-दावा' या दहशतवादी संघटनेच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत "जमात'ची पाच घातपात प्रशिक्षण केंद्रे बंद करण्यात आली असून हाफीझ सईद आणि झकी-उर-रेहमान लखवीसह जमातच्या प्रमुख दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.
जमातचे सदस्य असलेल्या तब्बल १२४ दहशतवाद्यांनाही पकडण्यात आले आहे. तसेच जमातशी संबंधित वेबसाइटही बंद करण्यात येत असल्याची माहिती पाकचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी दिली. त्याचबरोबर मुंबई हल्ल्याच्या तपासात भारताला सहकार्य करण्याची तयारीही पाकिस्तानने दाखवली आहे.
मुंबईवर झालेल्या हल्ल्यांत पाकिस्तानातल्या जमातच्या दहशतवाद्यांचा हात असल्याची माहिती हाती आल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाईची मागणी केली होती. संयुक्त राष्ट्र तसेच जगातील अनेक देशांना मुंबई हल्ल्याचे पुरावे दाखवण्यात आले होते. त्यानंतर कारवाईसाठी पाकवर प्रचंड दबाव होता. अखेर या दबावाचाच परिणाम म्हणून ही कारवाई झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अर्थात, या अतिरेक्यांना पाकिस्तान भारताच्या हवाली करणार किंवा कसे हे अजून स्पष्ट झालेले नाही. गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दडपणाला न जुमानता पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी व पंतप्रधान युसुफ रझा गिलानी यांनी अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे टाळले होते. तसेच भारताच्या ताब्यात अतिरेक्यांना न सोपवता त्यांच्यावर पाकिस्तानातील कायद्यांनुसार कारवाई करण्याची भूमिका पाकने घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर आज त्या देशाने केलेली कारवाई हे भारताच्या विदेश धोरणाचे मोठे यश मानले जात आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा