Tuesday, 13 January 2009

रोहित मोन्सेरातविरुद्ध आरोपपत्र दाखल

पणजी, दि. १२ (प्रतिनिधी) - अल्पवयीन जर्मन मुलीवर बलात्कार आणि अश्लील "एसएमएस' पाठवल्या प्रकरणी संशयित रोहित मोन्सेरात याच्यावर आज कळंगुट पोलिसांनी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचे तपासकाम पूर्ण झालेले असून दोन दिवसात आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती गेल्या आठवड्यात पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिली होती. यावेळी या आरोपपत्राची एक प्रत गोवा खंडपीठातही सादर करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला होता.
पिडीत मुलीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आणि "ते' अश्लील "एसएमएस' पाठवण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल व त्यातील सीम कार्ड यांच्या चाचणीचा अहवाल न्यायालयात आरोपपत्रासह सादर करण्यात आला आहे. सदर मोबाईल हा संशयिताचे वडील तथा शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या "राज' या कंपनीच्या नावे नोंद असल्याचे पोलिस तपासकामात उघड झाले आहे. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांनाही सहआरोपी करण्यात आले होते. परंतु, विधी संचालनालयाने बाबूश मोन्सेरात यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध होत नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्यांना या प्रकरणातून वगळण्यात आले होते. तशी माहिती खुद्द पोलिस खात्याने गेल्यावेळी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठालाही दिली आहे.
रोहित मोन्सेरात याच्या विरोधात पुरेपूर पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात बाल न्यायालयात या प्रकरणातील सुनावणी सुरू होणार आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा