Thursday, 15 January 2009

'बेपत्ता' अनिता उडिया पोलिस ठाण्यात हजर

मुंबई, दि. १४ : मुंबईवर हल्ला केलेल्या पाकिस्तानी अतिरेक्यांना हटकणारी अनिता उडिया ही महत्त्वाची साक्षीदार अचानक गायब झाल्यानंतर पुन्हा मुंबईत आली आहे. ती सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथील असून आपण साताऱ्याला गेल्याचा खुलासा तिने केला आहे. कफ परेड पोलिसांनी ही माहिती दिली. आता ती नक्की कोठे गेली होती याचा शोध पोलिस घेत आहेत.
मुंबईत आलेल्या अतिरेक्यांना पहिल्यांदा हटकणारी अनिता कुलाबा भागातून अचानक गायक झाल्यानंतर सीमा या तिच्या मुलीने आपली आई हरवल्याची तक्रार कफ परेड पोलिस ठाण्यातनोंदवली होती. पोलिस उपनिरीक्षक सुनील किवट हे तपास करीत होते.
दरम्यान अनिताला आपण हरवल्याची तक्रार नोंद झाल्याचे कळताच ती आज कफ परेड पोलिस ठाण्यात हजर झाली. तेव्हा तिने पोलिसांना सांगितले की मी साताऱ्याला गेले होते.
ती सापडल्यामुळे पोलिसांचा तिला शोधण्याचा तपास थांबला असला तरी ती खरोखरच साताऱ्याला गेली होती की आणखी कोठे याचा छडा पोलिस लावत आहेत.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा