Friday, 16 January 2009

गाडेधारकांचा होकार, १० पर्यंत मुदत

पणजी, दि. १५ (प्रतिनिधी): गाडेधारकांनी अखेर नव्या बाजार संकुलात जाण्याचे आज न्यायालयात मान्य केल्याने त्यांना नव्या बाजार संकुलातील गाड्यांचा ताबा घेण्यासाठी दि. १० फेब्रुवारी पर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.
सर्व गाडेधारकांचे स्थलांतरण झाल्यानंतर शहरातील सर्व गाडे हटवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी शहर गाडेधारक संघटनेने खंडपीठात दाखल केलेली याचिका आज मागे घेण्यात आली. नव्या बाजार संकुलात किंवा बाजार संकुलाच्या तिसऱ्या टप्प्यातील तळमजल्यावर जागा उपलब्ध होताच या गाडेधारकांना त्याठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. कोणतीही अडचण निर्माण न करता या गाडेधारकांनी स्थलांतरण करावे, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी शहरातील गाडे हटवण्याचा आदेश देताच महापालिकेने सर्व गाडेधारकांना नोटिशी बजावल्या होत्या. परंतु, यावेळी गाडेधारकांनी त्याला जोरदार विरोध करून कोणत्याही परिस्थितीत नव्या बाजार संकुलात न जाण्याचा निर्धार केला होती. शेवटी त्यांनी "आम्हाला तळमजल्यावर जागा द्या, आम्ही स्थलांतरण करण्यास तयार आहोत', अशी भूमिका घेतली. मात्र नव्या बाजार संकुलाच्या तळमजल्यावर जागा उपलब्ध नसल्याने गेल्या सोमवारी महापालिकेने पहिल्या मजल्यावर त्यांना जागा निश्चित करून दिली होती. या गाडेधारकांना जागा निवडण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे यावेळी महापालिकेचे वकील आत्माराम नाडकर्णी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा