Friday, 24 October 2008

बिहारमधील गुंडागर्दी सुरूच

पाटणा, दि. २३ : महाराष्ट्रातील रेल्वे परीक्षेदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मार खावून परतलेल्या बिहारमधील विद्यार्थ्यांनी गेल्या तीन दिवसांपासून पाटणा येथे गोंधळ घालणे सुरू केले आहे. हा गोंधळ आज गुरुवारीही कायम होता. या विद्यार्थ्यांनी आपला रोष रेल्वे वाहतूक आणि रेल्वे संपत्तीवर काढल्यामुळे रेल्वे प्रशासनाला आपल्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्याचे नवे वेळापत्रक तयार करावे लागले. अनेक गाड्यांचे मार्गही वळविण्यात आले.
मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यामुळे नालंदा निवासी पवनचे निधन झाल्यामुळे नालंदा जिल्ह्यातही बंद पाळण्यात आला.
सावधगिरीचा मार्ग म्हणून पाटणा येथून सुटणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पूर्व मध्य रेल्वेच्या दिनापूर विभागातील काही रद्द गाड्या नंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि त्यांचे वेळापत्रक बदलवून सोडण्यात आल्या. पाटणा-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस आणि संपूर्ण क्रांती एक्स्प्रेस या दोन महत्त्वाच्या गाड्या मात्र रद्द करण्यात आल्या.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविण्यात यावा, अशी मागणी करीत अनेक बिहारी विद्यार्थ्यांनी आपल्या राज्यात विविध ठिकाणी धुमाकूळ घातला. आज सकाळी लखीसराय आणि मोतिहारी रेल्वे स्थानकावर संतप्त विद्यार्थ्यांनी तोडफोड केली आणि रेल्वे वाहतूकही रोखून धरली. मोतिहारी येथे झाझा-पाटणा ट्रेन रोखण्यात आली. तर लखीसराय रेल्वे स्थानकावर हावडा-कठगोदाम एक्स्प्रेस थांबवून घेण्यात आली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. या गाड्यांमधील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे लखीसरायचे पोलिस अधीक्षक श्रीवेश्वर प्रसाद शुक्ल यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे रेल्वे संपत्तीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा नेमका आकडा आताच सांगणे कठीण असले तरी तो करोडोच्या वर आहे, असे दारापूर रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी रणजित सिंग यांनी सांगितले.
पवनच्या निधनामुळे संतप्त झालेल्या नालंदा येथील रहिवाशांनी आज कडकडीत बंद पाळला. या लोकांनी आपला राग अनेक दुकानांची आणि वाहनांही तोडफोड करून व्यक्त केला. हिंसक जमावावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे, असे नालंदाचे पोलिस उपअधीक्षक मो. अब्दुल्ला यांनी सांगितले. आंदोलकांनी पोलिसांवरही दगडफेक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा