Thursday, 20 March 2008

स्कार्लेटने मृत्युपूर्वी कोकेन घेतले होते

पणजी, दि. २० (प्रतिनिधी): स्कार्लेटच्या "व्हिसेरा' (आतड्यांची तपासणी) अहवालानुसार मृत्युपूर्वी तिने कोकेन, एक्स्टसी व मार्फिन या कॉकटेलचे सेवन केल्याचे व मद्य घेतल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई येथील कलिना या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत स्कार्लेटचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. या अहवालामुळे या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू आणखी भक्कम होणार असल्याचा दावा पोलिस महानिरीक्षक किशन कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
अहवालात नमूद केल्यानुसार स्कार्लेटने १७ फेब्रुवारीच्या रात्री सेवन केलेल्या अमलीपदार्थांचे प्रमाण ९० ते १०० मिलिग्रॅम आहे. त्यादिवशी ती पाण्यात पडली नसती तरी, "ड्रग'च्या अतिसेवनामुळे ती मरण पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मात्र तिला अमलीपदार्थ देणाऱ्या शाणा याने हे पदार्थ कोठून आणले होते, याचा शोध पोलिसांनी अजूनही लावलेला नाही. मृत्युपूर्वी स्कार्लेटला त्या रात्री "लुई' या हणजूण येथील शॅकच्या स्वयंपाकघरात शाणाबॉय या तरुणाने तिला अमलीपदार्थ दिले होते.
१७ फेब्रुवारीच्या रात्री व १८ च्या पहाटे तिला अमलीपदार्थाचा तीव्र डोस दारूतून नकळत पाजण्यात आला की, तिने त्याचे स्वतः सेवन केले, हा तपासाचा विषय ठरला आहे. मृत्यूच्या आदल्या दिवशी स्कार्लेट आपली स्पॅनिश मैत्रीण रुबीसोबत "कर्लिज' या शॅकवर दारू प्याली होती. त्यानंतर पहाटे ३ च्या दरम्यान स्कार्लेट "लुई' या शॅकवर आल्यानंतर पहाटे तिचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणातील "मुरली' याची जबानी फौजदारी गुन्हा कलम १६४ नुसार नोंदवून घेण्यात आल्याची माहिती श्री. कुमार यांनी दिली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा