Wednesday, 19 March 2008

स्कार्लेट मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी कराच

प्रदेश भाजपची सरकारकडे जोरदार मागणी
पणजी, दि. १९ (प्रतिनिधी): स्कार्लेट मृत्यू प्रकरण प्रामाणिकपणे व पारदर्शकतेने हाताळले जात असेल आणि राज्यातील अमलीपदार्थ व्यवहारांवरही पोलिस खात्याचे पूर्ण नियंत्रण असेल तर "सीबीआय' चौकशीचे आदेश देण्यास सरकार का कचरत आहे, असा सवाल भाजप विधिमंडळ गटाचे प्रवक्ते आमदार दामोदर नाईक यांनी केला. आज पणजी येथील भाजप मुख्यालयात बोलावलेल्या खास पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते आमदार फ्रान्सिस डिसोझा हजर होते. स्कार्लेट प्रकरणी सध्या जगभरात गोव्याची बदनामी सुरू असताना मुख्यमंत्री व गृहमंत्री मूळ विषयाला बगल देऊन जी वक्तव्ये करीत आहेत, त्यावरून सरकार जाणीवपूर्वक जनतेपासून काहीतरी लपवू पाहत असल्याचा संशय बळावत चालला आहे. प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्याने स्कार्लेटचा बुडून नव्हे तर घातपाताने मृत्यू झाल्याचे उघड झाले. केवळ विदेशी युवती म्हणून पर्यटकांवर आरोप करून चालणार नाही. या प्रकरणाव्दारे गोव्यातील कायदा व सुव्यवस्थेचे विदारक दर्शन सर्वांना घडल्याचा आरोप नाईक यांनी केला.
सरकारच्या गुप्तचर यंत्रणेकडून अशा व्यवहारात गुंतलेल्यांची सखोल माहिती मिळवून या लोकांना ताब्यात घेण्यासाठी काय उपाययोजना केली, याचा खुलासा सरकारने करावा. एका वृत्तवाहिनीने आयोजिलेल्या खुल्या चर्चेत सरकारच्यावतीने उपस्थित असलेले वीजमंत्री आलेक्स सिकेरा यांनी गोव्यातील अमलीपदार्थ व्यवहारांबाबत जाहीर समर्थन करणे दुर्दैवी असल्याचे नाईक म्हणाले. काल तर त्याच वृत्तवाहिनीने केलेल्या "स्टींग ऑपरेशन'द्वारे उपअधीक्षक शांबा सावंत यांच्या तोंडून या प्रकरणी राजकीय नेते व बडी मंडळी सामील असल्याचा भांडाफोड केला. यात गृहमंत्री रवी नाईक व त्यांचे पुत्र रॉय नाईक यांच्या नावाचाही उल्लेख झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे. सरकारने ताबडतोब याबाबत स्पष्टीकरण देणे अत्यावश्यक असल्याचे ते म्हणाले.
स्कार्लेटची आई फियोना हिने केलेले आरोप फेटाळणारे रवी नाईक "सीबीआय' चौकशी मागण्यास का घाबरतात, असे विचारून सत्य बाहेर येण्यासाठी ही चौकशी व्हायलाच हवी अशी मागणीही करण्यात आली. पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा असल्याने या प्रदेशाची बदनामी खपवून घेतल्यास हा व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. सरकारने गोव्याची प्रतिमा सांभाळण्यासाठी तात्काळ या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे नाईक यांनी जोर देऊन सांगितले.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा