Tuesday, 18 March 2008

पणजीचे महापौर, उपमहापौर निवडण्यासाठी आज बैठक

पणजी, दि. १८ (प्रतिनिधी): पणजी महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपल्याने उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी महापौरपदासाठी टोनी रोड्रिगीस व मिनीन डिक्रुज यांनी अर्ज दाखल केले आहेत, तर उपमहापौरासाठी सौ. वैदेही नाईक आणि यतिन पारेख रिंगणात उतरलेल्या आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारपर्यंत शेवटची मुदत होती. आवाजी मतदानाने महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.
दरम्यान,गेल्यावेळी वादग्रस्त ठरलेल्या बाजारमंडळाच्या त्या चार जणांना बाजार समितीतून बाहेर ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच समितीतील या चौकटीने गेल्यावेळी महापौर रोड्रिगीस यांच्या विरोधात बंड करून यतिन पारेख यांच्या गळ्यात माळ घालण्याची तयार केली केली होती. परंतु तो डाव फोल ठरला होता.
उद्या सकाळी ११.४५ वाजता आवाजी मतदान करून निवडण्यात येणाऱ्या समितीत विरोधी गटातील महिला नगरसेविकांचा समावेश करण्यांचाही निर्णय घेतला आहे. यात नगरसेविका वैदेही नाईक, ज्योती मसुरकर, दीक्षा माईणकर, वर्षा हळर्णकर तसेच रुपेश नाईक यांचा समावेश होण्याची शक्यता आहे, तर बाजार समितीत वादग्रस्त ठरलेले नगरसेवक उदय मडकईकर यांना बाजार समितीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
महापालिका स्थायी समिती, आरोग्य व बाजार समिती तसेच बाल व महिला समितीची निवड केली जाणार आहे. या प्रत्येक समितीत सहा नगरसेवकांचा समावेश असणार आहे.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा