Tuesday, 18 March 2008

"तो' नामफलक फोडल्याप्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात तक्रार

गोमंतक मराठी अकादमीच्या अध्यक्षांची माहिती
पणजी, दि. 17 (प्रतिनिधी): गोमंतक मराठी अकादमीच्या संरक्षक भिंतीचा नामफलक अकादमीने नव्हे तर, सार्वजनिक बांधकाम खात्याने लावला होता. खासदार निधीतून उभारण्यात येणाऱ्या या भिंतीचे काम पूर्ण होताच तेथे मराठीतून नामफलक लावला जाईल, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष नरेंद्र आजगावकर यांनी दिली. तसेच काल सकाळी अज्ञाताने तो नामफलक फोडून टाकल्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकावर दाखल करण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम खात्यालाही त्याची कल्पना देण्यात आल्याचे आजगावकर यांनी सांगितले.
80 वर्षीय स्वातंत्र्यसैनिक शामसुंदर नागवेकर यांनी आपण तो फलक फोडल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष उपेंद्र गावकर यांनी या घटनेचे स्वागत केले आहे. यापुढे मराठी अकादमीवर इंग्रजीत लिहिलेल्या पाट्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. गोव्यात मराठीलाही मानाचे स्थान असल्याने सर्व सरकारी कार्यालयांच्या फलकांमध्ये मराठीचा समावेश करावा, अशी मागणी गावकर यांनी केली आहे. तसे न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठी राजभाषा प्रस्थापन समितीच्या गेल्या बैठकीत नागवेकर यांनी तो इंग्रजी फलक त्वरित काढून तेथे मराठी फलक लावण्याची मागणी केली होती. अन्यथा तो फोडला जाईल, असा इशारा त्यांनी यापूर्वी दिला होता, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, त्याची दखल घेतली नसल्याची टिका गावकर यांनी केली.
खासदार निधीतून पर्वरी येथील मराठी अकादमी भवनाच्या सभोवती संरक्षण भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यावेळी खासदार श्रीपाद नाईक यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. हे काम येत्या एप्रिलमध्ये पूर्ण होणार आहे. त्यानंतर नवीन मराठी फलकाचे अनावरण केले जाणार आहे, अशी माहिती आजगावकर यांनी दिली.

1 comment:

  1. nice information

    Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

    Online Survey Website
    Free Survey Website
    Survey Websites in Canada
    Survey Websites in India
    Earn Money from Home
    Free Online Surveys

    ReplyDelete

आपली प्रतिक्रिया नोंदवा